अर्जेंटिनामध्ये 98 फूट लांबीच्या डायनासोरचे जीवाश्म | पुढारी

अर्जेंटिनामध्ये 98 फूट लांबीच्या डायनासोरचे जीवाश्म

ब्यूनस आयर्स : अर्जेंटिनामध्ये एका महाकाय डायनासोरचे जीवाश्म सापडले आहे. हा डायनासोर 9 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरत होता. त्याची डोक्यापासून शेपटीपर्यंतची लांबी तब्बल 98 फूट होती. पश्चिम अर्जेंटिनामध्ये सापडलेल्या या डायनासोर प्रजातीला ‘बस्टिंगोरीटिटन शिव’ असे नाव देण्यात आले आहे. हिंदू देवदेवतांपैकी संहाराची देवता असलेल्या शिवाचे नाव या महाकाय प्रजातीला दिले आहे.

‘एक्टा पेलियोंटोलोगिका पोलोनिका’ या विज्ञान मासिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार बी. शिव हा डायनासोर आतापर्यंतच्या ज्ञात सर्वात मोठ्या सॉरोपॉडस्पैकी एक आहे. त्याचे वजन सुमारे 74 टन होते. अर्थात हा सर्वात मोठा डायनासोर नाही.

जीवाश्म संशोधिका मारिया एथिज सायमन यांनी सांगितले की, दक्षिण अमेरिकेतील उत्तर पॅटागोनिया क्षेत्रात बी. शिव डायनासोरचे जीवाश्म शोधण्यात आले. या शोधामुळे हे समजले की, ते 55 टनांपेक्षा अधिक वजनाच्या मेगाटिटानोसॉर टायटॅनोसॉरपासून वेगळेपणाने विकसित झाले. पॅटागोनियामध्ये सध्या आपल्याला ज्ञात असलेल्या गोष्टींपेक्षा अधिक किंवा नवे काही शोधण्याची मोठी संधी आहे. या डायनासोरचा जवळजवळ संपूर्ण सांगाडा सापडलेला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button