ही महिला आहे की रोबो? | पुढारी

ही महिला आहे की रोबो?

चोंगकिंग : अगदी मनुष्याप्रमाणे काम करणारे रोबो बर्‍याच ठिकाणी कार्यरत असतात आणि ते बरेच उपयुक्तही ठरत असतात. मात्र, या रोबोच्या जगतात एक महिला वेटर अशीही आहे, जी अगदी हुबेहूब रोबोसारखी दिसते आणि यामुळे ती रोबो आहे की महिला वेटर, याबाबत ग्राहकांचा बराच गोंधळ उडतो. एका रेस्टॉरंटमधील या महिला वेटरचा व्हिडीओ बराच व्हायरल होत असून, या महिला वेटरच्या हटके शैलीने अर्थातच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला वेटर रोबोसारखे सर्व्ह करत असताना दिसून येते. आश्चर्य म्हणजे ती महिला रोबोसारखा हुबेहूब आवाजही काढू शकते. या महिलेचा आवाज ऐकता ती एआयच्या मदतीने तयार केली गेली असेल, असाही समज होतो. हा व्हिडीओ चीनमधील चोंगकिंग हॉट पॉट रेस्टॉरंटचा असल्याचे सांगण्यात येते. या महिलेने केवळ रोबोटिक हालचालींचेच नव्हे तर एआयसारखा आवाज काढण्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे.

Back to top button