दोन वर्षांत घटवले 141 किलो वजन | पुढारी

दोन वर्षांत घटवले 141 किलो वजन

इंडियाना : तंदुरुस्त राहण्यासाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम असत नाही. मात्र, अमेरिकेतील इंडियाना येथे राहणार्‍या लेक्सी रेड या युवतीने मात्र कहर केला आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत युवतीने तब्बल 141 किलो वजन घटवले. आता अनेकांसाठी ती रोल मॉडेल जरूर ठरली असली तरी या कालावधीत काही वेळा अगदी तिच्या जीवावरही बेतले होते.

आहार प्रचंड कमी केल्याने आणि अति व्यायामामुळे तिचे अनेक अवयव निकामी झाले व काही दिवस ती कोमातही गेली होती. मात्र, नंतर केवळ सुदैवानेच ती यातून सावरली असून दोन वर्षांपूर्वीची लेक्सी व आताची लेक्सी यातील आमूलाग्र बदल लक्षवेधी ठरतो आहे. याचे कारण असे की दोन वर्षांपूर्वी तिचे वजन 217 किलोग्रॅम होते. मात्र, नंतर तिने तब्बल 141 किलोग्रॅम वजन घटवले.

आता अपवाद म्हणजे वजन कमी करत असताना त्याचे काही तोेटेही होते आणि त्याचाही तिला सामना करावा लागला. वजन कमी करत असताना केलेल्या अतिरेकामुळे तिला कॅल्सिफिलेक्सिस नामक आजाराने ग्रासले आणि यामुळे तिची त्वचा ढिली पडू लागली. यादरम्यान तिला 59 आठवडे हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही. त्यानंतर तिला घरी परतण्याची परवानगी मिळाली आणि आता ती पूर्ण तंदुरुस्त झाली आहे.

Back to top button