तीन इस्रायल एकत्रित केले तरी क्षेत्रफळ राजस्थानपेक्षा कमीच! | पुढारी

तीन इस्रायल एकत्रित केले तरी क्षेत्रफळ राजस्थानपेक्षा कमीच!

वोस्लो : जगभरातील सर्वात मजबूत लष्करी दलाचा देश म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्यात इस्रायलचा आवर्जून समावेश आहे. 50 पेक्षा जास्त अरबी देशांचा विरोध असताना देखील हा देश अस्तित्वात आला. एक देश म्हणून जगाच्या नकाशावर कायम टिकून राहण्याचा त्यांचा संघर्ष मात्रा आताही सुरूच आहे. सध्या हेच इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे चर्चेत आले असले तरी या देशातील मोसाद ही गुप्तचर संघटना आपल्या कठीण ऑपरेशन्ससाठी अधिक ओळखली जाते. या देशाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, हा देश केवळ 2 तासाांत फिरून होईल इतका छोटा असून त्याचे क्षेत्रफळही तीन इस्रायल एकत्रित केले तर राजस्थानपेक्षाही कमी असेल, हे आश्चर्याचे आहे.

इस्रायल देशाची परिक्रमा करण्यासाठी 9 दिवस लागू शकतात. मात्र, पूर्वेकडून पश्चिमेकडे असा एका टोकाचा प्रवास दोन तासातच पूर्ण होऊ शकतो. इस्रायलची सध्याची लोकसंख्या 1 कोटीपेक्षाही कमी आहे. 2021 मधील जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या 93 लाख इतकी राहिली आहे. इस्रायलमध्ये पुरुष व महिलांना समान अधिकार आहेत. अगदी इस्रायलच्या लष्करी दलात देखील पुरुष व महिलांना समसमान अधिकार दिले जातात.

आजूबाजूने शत्रूंचा बराच वेढा असल्याने या देशाने येथील प्रत्येक नागरिकासाठी 3 वर्षांची सेनेत सेवा सक्तीची केली आहे. इस्रायलमध्ये महिला देखील मोठ्या मोठ्या बंदुका घेऊन फिरत असल्याचे चित्र सर्रास पाहण्यात येते. ही बाब त्यांच्यासाठी आणि अन्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची मानली जाते. या देशातील यहुदी धर्माचा इतिहास 3 हजार वर्षे जुना असल्याचे मानला जातो.

Back to top button