बंगळुरूत इमारत व्हाईट हाऊससारखी, मालकच बेपत्ता! | पुढारी

बंगळुरूत इमारत व्हाईट हाऊससारखी, मालकच बेपत्ता!

बंगळुरू : कर्नाटकाच्या राजधानीत एक आलिशान इमारत अशीही आहे, जी गगनचुंबी इमारतींपैकी एक म्हणून गणली जाते. या इमारतीची भव्यता निव्वळ डोळ्यात साठवण्यासारखी असते. मात्र, आश्चर्य म्हणजे या इमारतीचा मालक येथे पुन्हा पाऊल ठेवेल का, याचीही शाश्वती नाही.

400 फूट उंचीवरील ही इमारत व्हाईट हाऊससारखी दिसते. महालासारखे ही इमारत व्हाईट हाऊससारखी दिसते. किंगफिशर टॉवर्सच्या टॉपवरील ही इमारत साडेचार एकर क्षेत्रांत वसलेली आहे. 20 दशलक्ष डॉलर्स इतका यासाठी खर्च आला असून, लक्झरी रिटेल आणि ऑफिस स्पेस युबी सिटीत ही इमारत आहे.

या आलिशान इमारतीत एक वाईन सेलर, इनडोअर गरम पाण्याचा पूल, आऊटडोअर इन्फिनिटी पूल, छतावर हेलिपॅड अशा सुविधा आहेत. 2010 मध्ये ही 34 मजली इमारत उभी राहिली. यातील 3 ब्लॉकमध्ये 81 अपार्टमेंट आहेत. या आलिशान इमारतीची 55 टक्के मालकी युबीएचएलकडे; तर 45 टक्के मालकी विकसकाकडे आहे. या इमारतीचे मालक विजय मल्ल्या मात्र अनेक प्रकरणांत गुंतले असल्याने सध्या विदेशात आहेत आणि भारतातील या स्वमालकीच्या भव्य-दिव्य इमारतीत ते पुन्हा केव्हा परतणार, याबद्दलही अनिश्चितता आहे.

Back to top button