‘झिलँडिया’मुळे उलगडले कोट्यवधी वर्षांपूर्वीचे रहस्य! | पुढारी

‘झिलँडिया’मुळे उलगडले कोट्यवधी वर्षांपूर्वीचे रहस्य!

कॅनबेरा : 1820 मध्ये रशियन जहाजावरील काही नाविकांनी क्षितिजावर प्रथमच पेंग्विनने फुललेले बर्फाचा भव्यदिव्य किनारा पाहिला. ते फिम्बुल आईस शेल्फचे पहिले द़ृश्य होते. त्याने अंटार्क्टिकाच्या शोधावर शिक्कामोर्तब झाले. जगात सात मुख्य भूभाग आहेत, हे त्यावेळी अधोरेखित झाले. आजही युरोप, आशिया, आफ्रि का, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका हे भूभाग खंडात गणले जातात. पण, पुढे त्याला वेगळेच वळण मिळाले. कारण, त्यावेळी सात खंडांचे मॉडेल चुकीचे होते, असा दावा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियातील दक्षिण-पूर्वेकडे प्रदीर्घ कालावधीपासून विस्मरणात गेलेल्या झिलँडियाच्या शोधाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. भू-वैज्ञानिकांनी 375 वर्षांपूर्वीच या अज्ञात दक्षिणी भूभागाची भविष्यवाणी केली होती. पण, 375 वर्षांपर्यंत हा भूभाग गायब होता. आताही तो भूभाग 1 ते 2 कि.मी. पाण्यात बुडालेला आहे. भू-वैज्ञानिक यावर अभ्यास करत असून, यातील सर्व रहस्ये उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या एका पथकाने झिलँडियाचा सर्वात बिनचूक नकाशा जारी केला. यात पाण्याखालील क्षेत्रातील 50 लाख चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश होता. या प्रक्रियेत हा रहस्यमय खंड कसा बनला आणि तो मागील अडीच कोटी वर्षांपासून लाटांखाली का लपून आहे, यावर अभ्यास केला गेला. झिलँडिया हा जगातील सर्वात छोटा खंड आहे, यावर यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.

झिलँडिया खंडाची निर्मिती जवळपास 8 कोटी 30 लाख वर्षांपूर्वी झाली होती, असे मानले जाते. गोंडवाना हा खंड विभाजित होऊनच अनेक खंडांची निर्मिती झाली. गोंडवाना खंड विभाजित झाल्यानंतर जगातील सर्वात छोटा, सर्वात पातळ आणि सर्वात कमी अवधीसाठी अस्तित्वात असणारा खंड लयास गेला. पण, गोंडवानातील उत्तर पश्चिम आणि दक्षिण पश्चिमेकडे स्थित क्षेत्र नंतर ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका नावाने ओळखले जाऊ लागले. झिलँडियाचा काही भाग किंवा पूर्ण भाग एका खंडाच्या रूपात अस्तित्वात राहिले असावे, असे मानले जाते. मात्र, जवळपास 25 दशलक्ष वर्षांपूर्वी तो समुद्राखाली गायब झाला. न्यूझीलंडमध्ये अज्ञात भूभाग आढळून आला, तो याचे पहिले संकेत असू शकते. झिलँडियावरील महासागर अन्य महासागरांच्या तुलनेत बराच उथळ आहे, हेदेखील यादरम्यान स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button