Lottery : तब्बल 13 हजार कोटींची लागली लॉटरी | पुढारी

Lottery : तब्बल 13 हजार कोटींची लागली लॉटरी

वॉशिंग्टन : कुणाचे नशीब कसे व कधी उजळेल हे काही सांगता येत नाही. ध्यानीमनी नसताना एखाद्याच्या लॉटरी तिकिटाला मोठे बक्षीस लागते आणि ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ असा अनुभव येतो. अमेरिकेत एका माणसाबाबत असेच घडले. हा माणूस एका सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी गेला होता. तिथे सहज त्याने एक लॉटरी तिकीट खरेदी केले. या तिकिटाला 1.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 13,311 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला!

फ्लोरिडामध्ये राहणार्‍या या माणसाने जॅक्सनविलेच्या एका पब्लिक्स सुपरमार्केटमधून हे लॉटरी तिकीट खरेदी केले होते. फ्लोरिडामधील ही घटना यासाठीही खास आहे कारण अमेरिकेतील लॉटरीच्या इतिहासात इतकी मोठी रक्कम जिंकण्याची घटना तिसर्‍यांदाच घडली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये एका व्यक्तीने 2.04 अब्ज डॉलर्सची रक्कम जिंकली होती. फ्लोरिडामधील आता या नव्या विजेत्याला ठरवावे लागेल की त्याला सगळी रक्कम एकाच वेळी हवी की तीस वर्षे विभागून हवी. काही झाले तरी त्याला टॅक्सच्या रूपात सरकारला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे.

Back to top button