शुक्र नेहमी सकाळी व संध्याकाळीच का दिसतो? | पुढारी

शुक्र नेहमी सकाळी व संध्याकाळीच का दिसतो?

वॉशिंग्टन : आपले सौर मंडळ किती चित्रविचित्र आहे, हे सर्वश्रुत आहे. अंतराळ, सौर मंडळ आणि त्यातील ग्रहांबाबत सातत्याने संशोधन होत असताना यातून बरेच नवनवे शोध समोर येत असतात. शुक्र या ग्रहावर देखील आतापर्यंत बरेच संशोधन होत आले असून त्याचा सविस्तर तपशीलही थक्क करणारा आहे. शुक्रावर आताही बरेच संशोधन कार्य सुरू आहे.

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर आणि पृथ्वीअगोर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे आणि पृथ्वीतलाचा शेजारी आहे. या ग्रहाला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही संबोधले जाते. याचे कारण असे की, आकार व घनत्व या दोन्ही बाबतीत हा ग्रह पृथ्वीच्या समसमान आहे. आता हे दोन्ही ग्रह अजिबात जुळे नाहीत. त्यांच्यात काही फरक देखील आहेत. शुक्र हा अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्र फक्त सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो.

आता बुध ग्रह सूर्यापासून जवळ आहे, पण शुक्राचे तापमान त्यापेक्षाही अधिक आहे. शुक्राचे तापमान 475 डिग्री सेल्सियस इतके असते. शुक्रावरील हवेचा दबाव पृथ्वीच्या तुलनेत 90 पटीने अधिक आहे. समुद्राच्या खूप आत जो दबाव जाणवेल, तोच दबाव येथेही असतो. पृथ्वीच्या तुलनेत शुक्रावरील दिवस किती कालावधीचा असतो, हे देखील रंजक आहे. पृथ्वीवर ज्याप्रमाणे एक दिवस 24 तासांचा असतो, त्याप्रमाणे शुक्रावरील एक दिवस 243 दिवसांचा असतो. याचाच अर्थ असा की, पृथ्वीवरील 243 दिवस पूर्ण झाल्यानंतर शुक्राचा एक दिवस पूर्ण होतो. हा ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अधिक वेगाने सूर्याभोवती फिरतो. त्यामुळे, येथील एक वर्ष केवळ 225 दिवसांचे असते.
शुक्राचा एक दिवस 5832 तासांचा असतो. त्याचा पृष्ठभाग अधिक कडक असतो. शिवाय, तेथे ज्वालामुखी, पठार, खाई सर्व काही आहे. आश्चर्य म्हणजे हा ग्रह विषारी देखील आहे. येथे सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे धुके नेहमी असते. त्यामुळे एक प्रकारचा उग्र वास देखील तेथे सातत्याने असतो, असे संशोधनात आढळून आले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button