सर्वात मोठा ससा | पुढारी

सर्वात मोठा ससा

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : छोटा ससा दिसला तर त्याला कवेत घ्यावे, थोडेसे कुरवाळावे, असे वाटून जाणे साहजिकच आहे, पण,ससा नेहमीपेक्षा खूपच मोठा आणि भरभक्कम असेल तर असे वाटेल का? पूर्वाश्रमीच्या टि्वटरवर आणि आताच्या एक्सवर या सशाचा व्हिडीओ पोस्ट केला गेलेला व्हिडीओ बराच व्हायरल होत राहिला आहे. जोसेफ मॉरिस यांच्या ट्वीटर हँडलवरून हा व्हिडीओ सर्वप्रथम पोस्ट झाला. पण, या व्हिडीओतील अजस्त्र ससा पाहिला तर हा ससाच आहे का, असे विचारण्याची वेळ यावी, अशी स्थिती आहे.

हा ससा तब्बल चार फुटांचा आहे आणि तब्येतीनेही भरभक्कम आहे. त्यामुळे त्याला हाताळताना देखील सदर व्यक्तीला बरीच कसरत करावी लागत होती, हे या व्हिडीओत प्रकर्षाने दिसून येत होते. अशा प्रकारच्या मोठ्या सशाच्या जातीला फ्लेमिश रॅबिट या नावाने ओळखले जाते.

या जातीतील ससे प्रामुख्याने युरोप व उत्तर अमेरिकेत काही घरात पाळलेही जातात. या सशांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना काही प्रमाणात प्रशिक्षण देखील दिले जाऊ शकते. हे ससे 3 ते 4 फुटांपर्यंत व वजन 10 किलोपर्यंत असू शकते. अमेरिका रॅबिट ब-ीड असोसिएशननुसार, असे ससे सात वेगवेगळ्या रंगात आढळून येतात. यातील सर्वाधिक वजनाचा फ्लेमिश जायंट डॅरियस 22 किलोचा होता.

Back to top button