Jupiter : गुरूच्या पटलावर तुफानी वादळ | पुढारी

Jupiter : गुरूच्या पटलावर तुफानी वादळ

वॉशिंग्टन : गुरू हा सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह असून सौर मंडळाच्या मधोमध असल्याने आणि गुरुत्वाकर्षणामुळे तेथे छोेटेमोठे विस्फोट होत असतात. गुरू ग्रहावर अलीकडेच भयंकर तुफान आढळून आले आणि याचे कारण असे आहे की, एका अज्ञात वस्तूची ग्रहाशी मोठी धडक झाली. ही घटना जपानमधील ओकिनावा बेटावरील अभ्यासकांनी पाहिली असल्याचा दावा केला जात आहे. ही धडक अनेक तास पाहता येत होती, असे या संशोधकांचे मत आहे. गुरू ग्रहावरील ही अशा प्रकारची पहिलीच घटना मानली जाते.

खगोल शास्त्रज्ञांनी प्रथमच गुरू ग्रहाला एखाद्या अज्ञात घटकाची धडक बसले असल्याचे म्हटले आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गुरूच्या पटलावर तुफानी वादळाची अनुभूती आली. ही धडक शास्त्रज्ञांनी कॅमेराबद्ध केली असल्याचे सांगण्यात येते. जपानी बेट ओयासिस व पॉनकॉटस येथे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेशन प्रोजेक्टद्वारे ही धडक पाहण्यात आली होती. यापूर्वी 1994 मध्ये धुमकेतू सोमेकर लेवी 9 गुरुशी धडकला होता. ही घटनाही शास्त्रज्ञांनी पाहिली होती. पण, त्यावेळी ती रेकॉर्ड करण्यात आली नव्हती.

ओयासिस व पॉनकॉट्सच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली असून त्यात गुरू ग्रहाचे अवलोकन केले जात असताना ही घटना निदर्शनास आल्याचे त्यात नमूद केले. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर चीनमध्येही होस्टिंग सोशल साईटने त्याला दुजोरा दिला. 2013 मध्ये एका अभ्यासात गुरू 5 ते 20 मीटर अंतरावरील घटकांशी 12 ते 60 वेळा धडकतो आणि 100 मीटरवरील घटकांशी काही वर्षांतून नियमितपणे धडकतो, असे आढळून आले होते.

Back to top button