पंधरा वर्षांपासून केवळ खडू खाऊन जिवंत! | पुढारी

पंधरा वर्षांपासून केवळ खडू खाऊन जिवंत!

हैदराबाद : अनेक लोकांचा आहार विचित्रच असतो. एक महिला अनेक वर्षे केवळ चहा पिऊन जिवंत राहिल्याचेही उदाहरण आहे. आता असेच एक उदाहरण तेलंगणामध्ये पाहायला मिळत आहे. तेथील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील बदनाकल गावात मल्लव्वा ही वृद्ध महिला राहते. ही महिला गेल्या पंधरा वर्षांपासून नियमित जेवणाऐवजी केवळ खडूचे तुकडे खात आहे.

पंधरा वर्षांपूर्वी ती जेवायला बसल्यावर आपल्या ताटात अनेक किडे असल्यासारखे तिला दिसले. त्यामुळे तिने जेवण घेतले नाही. दुसर्‍या दिवशीही तिला असाच अनुभव आल्याने तिने अन्नच सोडले. यानंतर तिला खडूचे काही तुकडे सापडले व ते तिने खाल्ले.

खडूच्या कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सीजन असलेल्या या तुकड्यांनी तिची भूक भागली. त्यानंतर तिने विहिरीतून पाणी घेऊन तहान भागवली. या प्रकारानंतर ती रोजच अन्नाऐवजी खडू खाऊ लागली व विहिरीचे पाणी पिऊ लागली. अर्थात तिने या काही वर्षांमध्ये सामान्य अन्न खाण्याचाही प्रयत्न केला, पण काही तासातच तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती अद्याप खडू खाऊनच उदरभरण करते!

Back to top button