ट्रकइतका भव्य ट्रॅक्टर… याला म्हणतात जुगाड! | पुढारी

ट्रकइतका भव्य ट्रॅक्टर... याला म्हणतात जुगाड!

नवी दिल्ली : भारतात जुगाड करणार्‍यांची संख्या अजिबात कमी नाही. केव्हा कोणाच्या डोक्यात कशी सुपीक कल्पना तयार होईल आणि कशी त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊन ती कल्पना प्रत्यक्षात साकारली जाईल, याचा नेम कधीच देता येणार नाही. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ निव्वळ थक्क करणारे असतात. काही वेळा तर त्यावर विश्वास ठेवणेही कठीण असते. सध्या अनेक जुगाड केलेला एक अजब ट्रॅक्टर व्हायरल होत राहिला असून जवळपास ट्रकच्या आकाराइतका हा ट्रॅक्टर सर्वांसाठीच थक्क करणारा ठरतो आहे.

या अनोख्या ट्रॅक्टरचे पहिले दोन्ही टायर नेहमीप्रमाणे बरेच छोटे आहेत. मागील टायर मात्र नेहमीपेक्षाही बरेच मोठे आहेत. या दोन्ही टायर्समधील अंतर देखील प्रमाणापेक्षा अधिक आहे. या ट्रॅक्टरची उंची आणखी थक्क करणारी आहे. हा ट्रॅक्टर पाहिल्यानंतर असे वाटते की, एखाद्या नाल्यातून किंवा छोट्या तलावातून देखील ते सहजपणे मार्ग काढू शकेल. सोशल मीडियावर इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ बराच व्हायरल होत राहिला असून तो अनेकांनी शेअर देखील केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला हेवी ड्रायव्हर अशी चपखल कॅप्शनही देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
Back to top button