सर्वात दूर अंतरावरील कृष्णविवराचा शोध | पुढारी

सर्वात दूर अंतरावरील कृष्णविवराचा शोध

वॉशिंग्टन ः कृष्णविवरे ही अंतराळातील सर्वात रहस्यमय गोष्टींपैकी एक आहेत. अगदी प्रकाशकिरणालाही ‘गट्टम’ करणार्‍या कृष्णविवरांची आकर्षणशक्ती अतिशय तीव— असते. आता ‘नासा’ने जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीच्या सहाय्याने सर्वात दूरवरील सुपरमॅसिव्ह म्हणजे महाशक्तिशाली कृष्णविवराचा शोध घेतला आहे. ‘बिग बँग’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या महाविस्फोटानंतर ब—ह्मांड अस्तित्वात आले असे मानले जाते. या ‘बिग बँग’नंतर केवळ 57 कोटी वर्षांनी हे कृष्णविवर बनले होते. ते ‘सीईईआरएस 1019’ या आकाशगंगेच्या केंद्रभागी आहे.

या कृष्णविवराचे द्रव्यमान 90 लाख सूर्यांइतके आहे. वैज्ञानिकांनी त्याच्याशिवाय अन्यही दोन छोट्या कृष्णविवरांचा शोध लावला आहे जे ‘बिग बँग’नंतर एक ते 1.1 अब्ज वर्षांनी बनले होते. याशिवायही अंतराळात असे अनेक कृष्णविवरे आहेत जी अब्जावधी सूर्यांइतक्या द्रव्यमानाची आहेत. अंतराळात सहजपणे त्यांचा छडा लावता येतो, याचे कारण म्हणजे ते प्रत्येक क्षणी अंतराळातील सामग्री गिळंकृत करीत असतात. प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रभागी एक कृष्णविवर असते.

आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराच्या सारखेच ‘सीईईआरएस 1019’ नावाचे हे कृष्णविवर आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रभागी असलेले कृष्णविवर 46 लाख सूर्य द्रव्यमानाइतके आहे. ‘सीईईआरएस’ सर्व्हे डेटाचा वापर करणार्‍या तीन वेगवेगळ्या संशोधनांना ‘द अ‍ॅस्ट्राफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की हे कृष्णविवर आधी शोधलेल्या कृष्णविवरांच्या तुलनेत कमी चमकदार आहे. ब—ह्मांडाच्या निर्मितीनंतर ते लगेचच
कसे बनले हे समजून घेणे सध्या कठीण आहे.

संबंधित बातम्या
Back to top button