कार-बंगल्यापेक्षा महागडा कीटक! | पुढारी

कार-बंगल्यापेक्षा महागडा कीटक!

न्यूयॉर्क : घरात पाळीव प्राणी असणे आता सर्वसाधारण झाले आहे. अनेक लोक पाळीव प्राण्यांचे शौकीन असतात आणि या पाळीव प्राण्यांबरोबर वेळ व्यतित करणे त्यांना नेहमीच आवडते. कुटुंबाचाच एक अविभाज्य घटक झालेल्या या प्राण्यांसाठी अगदी हजारोचा खर्च करण्यास देखील मागेपुढे पाहिले जात नाही; पण एखादी व्यक्ती लक्झरी कार किंवा एखाद्या आलिशान घरापेक्षाही महागडी किंमत मोजत फक्त एखादा कीटक विकत घेऊन तो घरी पाळत असेल तर त्याला काय म्हणावे? नेमका असाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्टॅग बीटल, असे या किटकाचे नाव आहे.

आता ज्या किटकाची माहिती घेतली जात आहे, त्याची किंमत हजार-लाखात नव्हे तर चक्क कोटीच्या घरात आहे. त्यामुळे हा कीटक जर कुठे मिळाला तर काही खास न करताच आपल्याला कोट्यधीश होता येऊ शकते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा कीटक पृथ्वीवरील अतिशय दुर्मीळ असून त्याचा आकार 2 ते 3 इंच इतकाच असतो.

जगभरातील खूप कमी लोक असे असतात, जे असे अजब कीटक पाळतात; पण याची किंमत ऐकली तर ते पाळण्यास अनेक जण तयार होतील. स्टॅग बीटल हा पृथ्वीवर आढळून येणारा सर्वात मोठा बीटल आहे, जो साधारणपणे साडेआठ सेंटीमीटर्सपर्यंत वाढू शकतो. हा कीटक खरेदी करण्यासाठी काहींची अगदी एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मोजण्याचीही तयारी असते. या किटकापासून अनेक प्रकारची औषधे तयार केली जाऊ शकतात. या किटकाचे आयुर्मान साधारणपणे 7 ते 8 वर्षे असू शकते, असे जाणकार सांगतात.

Back to top button