40 प्रकारची फळे देणारे एकच झाड! | पुढारी

40 प्रकारची फळे देणारे एकच झाड!

न्यूयॉर्क : एकच झाड 40 प्रकारची फळे देते, असे ऐकल्यास भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. पण, अमेरिकेतील सेराक्यूज विद्यापीठातील व्हिज्युअल आट्रसचे प्राध्यापक वॉन ऐकेन यांनी असे खास झाड तयार केले आहे. हे छोटेसे झाड ट्री ऑफ 40 नावाने प्रसिद्ध असून या झाडाला बोरे, चेरी, नेक्टराईनसारखी अनेक फळे लागतात.

आता हे झाड मात्र भलतेच महागडे असून त्याची किंमत थोडीथोडकी नव्हे तर 19 लाख रुपये इतकी आहे. खास ग्राफ्टिक तंत्राद्वारे हे झाड तयार केले गेले असून एका ठराविक कालखंडात एक छोटी फांदी कळीसह तोडून मुख्य झाडात छेद करून लावली जाते. त्यानंतर पोषक तत्त्वाचा लेप लावून छेद बंद केला जातो. यामुळे ही छोटी फांदी मुख्य झाडाचा एक भाग होऊन जाते आणि त्याला नंतर यथावकाश फुलेफळे येत राहतात.

Back to top button