Lok sabha Election 2024 Result : दक्षिण गोव्यात आरजी ठरणार ‘गेम चेंजर?’,पल्लवी धेंपे अकरा हजार मतांनी पिछाडीवर

File Photo
File Photo

मडगाव, पुढारी वृत्तसेवा: अपेक्षेप्रमाणे दक्षिण गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत रंगत चालली असून काँग्रेसचे उमेदवार विरिएतो फर्नाडिस यांची गाडी पल्लवी धेंपेंना मागे टाकत सुसाट चालली आहे. सकाळी साडेदहा वाजता सांगे आणि केपे तालुक्यातील मतमोजणी सुरू असतांना विरिएतो पल्लवी धेंपे पेक्षा तब्बल 11 हजार मतांनी आघाडीवर होते. आरजीच्या रुबर्ट परेरा यांच्या खात्यावर सहा हजार मते जमा झाली होती. अरजीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ते गेम चेंजर ठरू शकतात अशी शक्यता आहे.

क्षणा क्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या या निकालाकडे संपूर्ण दक्षिण गोव्याचे लक्ष लागून आहे.मतमोजणी सुरू होताच पल्लवी धेंपे आघाडीवर होत्या. पण साडेनऊच्या सुमारास काँग्रेसचे उमेदवार विरिएतो फर्नांडिस नऊ हजार मतांनी आघाडीवर होते. सांगे मतदारसंघाची मतमोजणी सुरू होताच पल्लवी धेंपे यांनी वेग धरला मात्र पुन्हा तो वेग जास्त जास्त काळ टिकू शकला नाही. साडेदहाच्या दरम्यान त्या अकरा हजार मातांनी पिछाडीवर होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news