Omelet : तब्बल दीड लाखाचे ऑम्लेट! | पुढारी

Omelet : तब्बल दीड लाखाचे ऑम्लेट!

न्यूयॉर्क : जगात महागड्या पदार्थांची नेहमीच चर्चा होत असते. एखादे ऑम्लेट, मग ते अंड्याचे असो किंवा टोमॅटोचे त्याची किंमत काही अव्वाच्या सव्वा नसते. मात्र अमेरिकेत न्यूयॉर्कच्या नॉर्मा येथील ऑम्लेटची किंमत तब्बल 2 हजार डॉलर्सची आहे. भारतीय चलनात ही किंमत सुमारे 1 लाख 64 हजार 171 रुपये होते.

या ऑम्लेटचे नाव आहे ‘लॉबस्टर फ्रिटिटा’. नावावरूनच लक्षात येते की यामध्ये लॉबस्टर म्हणजेच झिंग्याचाही वापर केलेला असतो. झिंग्याच्या काही चवदार प्रजातींचा वापर करून हे ऑम्लेट बनवले जाते. न्यूयॉर्कमध्येच ‘सेरेंडिपिटी3’ या कॅफेमध्ये सोन्याने मढवलेले आईस्क्रिमही मिळते. त्याचे नाव आहे ‘गोल्डन ओपलेन्स संडे’.

एखादा बर्गरही भलताच महागडा असेल याची आपण कल्पना करणार नाही. मात्र ‘फ्लुइर बर्गर’ची किंमत 5 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 4 लाख 10 हजार 427 रुपये इतकी आहे. न्यूयॉर्कमध्येच 24 कॅरेट सोन्याचा थर असलेला पिझ्झाही मिळतो. त्याला ‘गोल्ड पिझ्झा’ असे म्हटले जाते. जगातील सर्वात महाग मिठापासून बनवलेले पॉपकॉर्नही असेच महाग आहेत. त्यांची किंमत एका टिनला 2500 डॉलर्स म्हणजे सुमारे 2,05,215 रुपये इतकी असते!

Back to top button