Brain : बनावट स्मृतीही तयार करतो मेंदू! | पुढारी

Brain : बनावट स्मृतीही तयार करतो मेंदू!

अ‍ॅम्स्टरडॅम : आठवणींच्या अडगळीतील एखादी गंजलेली टाचणी कधी टोचेल हे सांगता येत नाही, (Brain) असे पुलंनी एका पुस्तकात म्हटले होते. माणसाच्या स्मृतीमध्ये वाईट तसेच काही चांगल्या आठवणीही साठवून ठेवलेल्या असू शकतात. (Brain) असे असतानाही आपला मेंदू खर्‍या आठवणींपेक्षा अधिक वेगाने बनावट आठवणीही तयार करतो, हे तुम्हाला माहिती आहे का? इतकेच नव्हे तर बनावट आठवणींची दर 3 सेकंदाला सुमारे 30 पर्यंत वाढ होते. नेदरलँडस्मधील अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एका संशोधनाच्या आधारे ही बाब समोर आली.

या अभ्यासासाठी चार वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. (Brain) पहिल्या प्रयोगात लोकांना लाल कारचे चित्र दाखवण्यात आले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की त्यांनी लाल रंगाची कार असलेला रस्ता पाहिला होता. ज्यांनी हे खोटे सत्य मानले, त्यांनी नंतर या साखळीशी संबंधित काही इतर प्रतिमा पाहिल्या ज्यात ती लाल कार नव्हती. असे असले तरी ही सर्व छायाचित्रे त्यांना यापूर्वी दाखविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. यानंतर त्यांना प्रश्न विचारले असता त्यांना योग्य उत्तरे देण्यात फारशी अडचण आली नाही. त्याचप्रमाणे दुसर्‍या एका प्रयोगात संशोधकांनी अक्षरे सरळ आणि उलट क्रमाने दाखवली. काही सहभागींना अक्षरे पाहण्यापूर्वी ब्लॉकरचा सामना करावा लागला. मूळ स्मृती बदलता यावी यासाठी ते विस्कळीत अक्षरांपासून बनवले.

सहभागींना पहिल्या स्लाईडवरून लक्ष्य अक्षर आठवण्यास सांगितले. पहिली स्लाईड पाहिल्यानंतर अर्ध्या सेकंदानंतर, 20 टक्के लोकांनी उद्दिष्ट अक्षराची काल्पनिक स्मृती तयार केली होती. मानवी मेंदूतील आठवणी तो जे पाहतो त्यानुसार बदलतात. अंतर्गत पूर्वग्रहांतूनही आकार घेतात खोट्या आठवणी लोकांना एक चेहरा व व्यवसायाचे चित्र दिले जाते तेव्हा काळ्या रंगाची मोठी दाढी आणि मिशा असणार्‍या चेहर्‍यांना “ड्रग डीलर’ सारख्या गुन्हेगारी शिक्क्याशी जोडण्याची अधिक शक्यता असते. पूर्वग्रह स्मृतींवर परिणाम करतात हे दिसते.

संबंधित बातम्या
Back to top button