मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजता पासून सुरू झाले आहे. देशभरात ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रासह १० राज्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत मतदान पाहता ६. ४५ टक्के टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासह १० राज्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६. ४५ टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघ निहाय सरासरी मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे.
हेही वाचा