सर्वात महागडी ‘हॅलो किट्टी’! | पुढारी

सर्वात महागडी ‘हॅलो किट्टी’!

टोकियो ः जपान्यांचे रोबो आणि मांजरावरील प्रेम जरा जास्तच आहे. त्यामुळेच तिथे मांजराच्या रूपातील रोबोचे अ‍ॅनिमेशन पात्र ‘डोरेमॉन’ही लोकप्रिय आहे. अशीच एक मांजरही तिथे प्रसिद्ध आहे. तिचे नाव ‘हॅलो किट्टी’. या पात्राचे खरे नाव ‘किट्टी व्हाईट’ असे आहे. यूको शिमिझू यांनी हे पात्र निर्माण केले.

हॅलो किट्टीच्या रूपातील पहिली पर्स 1975 मध्ये बाजारात आली. त्यानंतर तिच्या रूपातील अनेक वस्तूही बाजारात आल्या आहेत. यापैकी सर्वात महागडी वस्तू म्हणजे स्वारोव्हस्की स्फटिक जडवलेले तिचे पुतळे. तब्बल 19,636 स्वारोव्हस्की क्रिस्टल्स जडवलेल्या हॅलो किट्टी पुतळ्याची किंमत 10 लाख 20 हजार 411 रुपये आहे. गुलाबी, पांढर्‍या, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या स्फटिकांचा वापर करून हा सुंदर पुतळा बनवलेला आहे. असे पुतळे महाग असले तरी अनेक हौशी जपानी लोक ते खरेदी करीत असतात.

संबंधित बातम्या
Back to top button