सुदानमध्ये सापडले 2700 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे अवशेष | पुढारी

सुदानमध्ये सापडले 2700 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे अवशेष

लंडन : सध्याच्या सुदान, इजिप्त आणि मध्य-पूर्वेतील काही भागांवर 2700 वर्षांपूर्वी ‘कुश’ नावाचे साम्राज्य होते. त्या काळातील मंदिराच्या अवशेषांचा सुदानमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी शोध घेतला आहे. या मंदिराच्या दगडांवर चित्रलिपीही कोरलेली आहे.

मंदिराचे हे अवशेष सुदानच्या ‘ओल्ड डोंगोला’ या ठिकाणी असलेल्या मध्ययुगीन सिटाडेलजवळ सापडले आहेत. या मंदिराच्या काही शिळांवर विविध आकृत्या आणि चित्रलिपी कोरलेली आहे. त्यावरून त्यांचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे. व्हर्साय युनिव्हर्सिटीतील पोलिश सेंटर ऑफ मेडिटेरियन आर्कियोलॉजीमधील पुरातत्त्व संशोधकांनी सांगितले की हा शोध खरे तर आश्चर्यकारकच आहे. याचे कारण म्हणजे याठिकाणी 2700 वर्षांपूर्वीच्या कोणत्याही वस्तू सापडल्या नव्हत्या. येथील एका शिळेवरील मजकुरावरून समजते की हे मंदिर कावाच्या अमुन-रा नावाच्या देवतेचे होते. ‘कावा’ हे एका प्राचीन ठिकाणाचे नाव असून ‘अमुन-रा’ नावाची देवता कुश साम्राज्यात तसेच इजिप्तमध्ये लोकांच्या पूजेत होती.

Back to top button