तीन तारे असलेल्या बाह्यग्रहाचा शोध | पुढारी

तीन तारे असलेल्या बाह्यग्रहाचा शोध

न्यूयॉर्क : बह्मांडातील ‘बाह्य’ग्रहांचा अभ्यास करण्यात खगोलशास्त्रज्ञ कोणतीच कसर सोडत नाहीत. यातून ते सूर्यमालेच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांमध्ये खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडातील अनोख्या संरचना सापडतात. यामध्ये असा एखादा बाह्यग्रह आढळतो की, तो दोन तार्‍यांभोवती फिरत असतो. मात्र, आता अशा एका बाह्यग्रहाचा शोध लावला आहे की, तो एक, दोन नव्हे तर तीन तार्‍यांभोवती चकरा मारत आहे. हा एक अनोखा शोध समजला जात आहे.

ही एक अशी अवकाशीय प्रणाली आहे की, त्यामध्ये दोन तार्‍यांभोवती फिरणारे ग्रह कमी प्रमाणात आढळतात. असे असताना आता तीन तार्‍यांभोवती एकच ग्रह फिरताना आढळला आहे.

अमेरिकेच्या लास वेगासमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडा’चे संशोधक व त्यांच्या पथकाने तीन तार्‍यांभोवती फिरणारा हा अनोखा बाह्यग्रह शोधून काढला आहे. सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते की, ब्रह्मांडातील सर्व तारे हे एकाहून अधिक तार्‍यांसोबत जन्मले.

मात्र, आज एकाकी दिसणारे तारे हे कालांतराने आपल्या सहकारी तार्‍यापासून वेगळे झाले. आपल्या सूर्याबाबतही अशीच धारणा आहे. आपला सूर्यसद्धा आपल्या सहकारी तार्‍यापासून वेगळा झाला आहे.

अशाच तीन तार्‍यांभोवती फिरणार्‍या बाह्यग्रहाचा खगोलशास्त्रज्ञांनी शोध लावला. ‘एटकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ऐरे स्पेस टेलिस्कोप’च्या मदतीने अवलोकन करून या बाह्यग्रहाचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला.

Back to top button