Twin sisters wish : जुळ्या बहिणींची 'ती' अविश्वसनीय इच्छा | पुढारी

Twin sisters wish : जुळ्या बहिणींची 'ती' अविश्वसनीय इच्छा

मेलबर्न : दोन सारख्या दिसणार्‍या तरुणी ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये राहतात. विशेष म्हणजे त्या दिसायलाच एकसारख्या आहेत एवढेच नव्हे तर दिवसांतील प्रत्येक गोष्ट एकाच वेळी करतात. अंगावरील कपडेही एकसारखेच घालतात. एकाच वेळी दोघीही जेवतात. एकाच बेडवर झोपतात आणि आंघोळसुद्धा एकाचवेळी करतात. दोघींचे वय आहे 35 वर्षे. मात्र, यातील सर्वस्वी वेगळी गोष्ट म्हणजे सध्या एकाच पुरुषाकडून गरोदर राहण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत. (Twin sisters wish) ही गोष्ट ऐकून तुमचाही कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे.

ऑस्ट्रेलियात राहणार्‍या 30 वर्षीय या तरुणींचे नाव अ‍ॅना आणि लुसी डेसिक असे आहे. (Twin sisters wish) या दोघी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोबत घालवतात. गेल्या 11 वर्षांपासून बेन या तरुणासोबत राहत आहेत. दोघींचा प्रियकरदेखील एकच व्यक्ती आहे. आता बेनपासून एकाच वेळी गर्भधारणा व्हावी अशी दोघींची इच्छा आहे. अ‍ॅना सांगते, आम्ही या आधी एकदाही गरोदरपणाची चाचणी केली नाही. आमच्यासाठी आम्ही गरोदर आहोत की नाही हे तपासणे आश्चर्यजनक असणार आहे.

आम्ही आता 35 वर्षांच्या असून त्यामुळे आम्हाला आता बाळ पाहिजे. याच विषयावर बोलताना लुसी म्हणाली की, खरे सांगायचे तर आम्हाला दोघींनासुद्धा एकाच वेळी बाळ होणे अपेक्षित आहे. (Twin sisters wish) मधल्या काळात मला हृदयविकाराचा झटका आला होता. कारण, मला वाटले, अ‍ॅना गरोदर आहे आणि मी गरोदर नाही. आम्ही एकाच व्यक्तीपासून गरोदर राहण्याची तयारी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button