

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या अरल भागात ५.९ तीव्रतेचा तर किर्गिस्तानमध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, चीनमध्ये सकाळी ५.४९ वाजता (स्थानिक वेळेनुसार) भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंप चीनमधील अरलच्या १११ किमी दक्षिण पूर्व भागात झाला. किर्गिस्तानला देखील ५.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, राजधानी बिश्केकपासून ७७६ किमी अंतरावर सकाळी ५.१९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही देशांमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. रविवारी पाकिस्तानच्या काही भागांना ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी वेळात या घटना घडल्या आहेत.