मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप- शिंदे गटात असंतोष उफाळणार, खडसेंचा गौप्यस्फोट | पुढारी

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप- शिंदे गटात असंतोष उफाळणार, खडसेंचा गौप्यस्फोट

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जात आहे. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले. सरकार स्थापन होऊन सात महिने उलटले. मात्र अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. या कालावधीनंतर देखील १८ मंत्री या राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते निर्णय होऊ शकत नाही. जनसंपर्क कमी पडतो आहे. भाजपामधले अनेक आमदार, तर शिंदे गटातले सर्व आमदार मंत्रीमंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला मंत्रिमंडळात घ्यावे, हा पेच असल्याने मंत्रिमंडळाचे विस्तार होत नाही. एकदा मंत्रीमंडळाचा विस्तार झाला की आपोआप त्यांच्यात असंतोष उफाळून येईल. त्या असंतोषाला तोंड देणे कठीण जाईल, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबतो आहे, असा गौप्यस्फोट करून एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवून दिली.

कल्याणमध्ये रविवारी आयोजित केलेल्या लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमासाठी खडसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या युती झाली. मात्र याबाबत युतीचा प्रस्ताव किंवा कुठलेही बोलणे राष्ट्रवादी काँग्रेसशी झाले नाही. तसा प्रस्ताव देखील आला नसल्याचे शरद पवार यांनी कालच सांगितले आहे. प्रस्ताव आल्यानंतर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.

सी सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील असा दावा करण्यात येत आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी हा सर्व्हे सत्यपरिस्थितीवर आधारित अशा स्वरूपाचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता सरकार अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो यावर ते सरकार अवलंबून आहे. त्याची टांगती तलवार या सरकारवर आहे. सरकार नावाला चालले असून या सरकारमध्ये समन्वय नाही. मुळात राज्यात महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झाले आहे. एका पक्षाला फोडणे पूर्ण पक्षाला एकत्र घेणे आणि त्या माध्यमातून हे अलीकडे राज्यात महागाई आणि बेर- ोजगारी हे प्रश्न आहेत. इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

महाराष्ट्रावर ६ लाख ६६ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या सर्वात मोठा भाग ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज मधला कर्ज किंवा हमी या सात महिन्यांच्या काळात दिली आहे. विविध विकास कामांबद्दल हे कर्ज किंवा हमी आहे त्याबद्दल दुमत नाही, मात्र राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतो आहे. एकंदरीत सर्व स्थिती पाहता सर्वसामान्य माणूस प्रत्यक्ष स्थिती अनुभवतोय की त्याला त्याचा फारसा काही लाभ होत नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात राज्यातील जनता मतदान करेल, अशा स्वरूपाचा संकेत या सी सर्व्हेच्या माध्यमातून दिला जात आहे. अलीकडच्या | कालखंडात राज्याची स्थिती आहे त्याचे प्रतिबिंब या सर्व्हेतून दिसत असल्याचेही खडसे यांनी खडसावून सांगितले.

मोर्चाच्या माध्यमातून मतदान वाढविण्याचा हेतू

लहुजी आजच्या बाबत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे राज्यभर आयोजन केले जात आहे. यावर बोलताना खडसे यांनी भाजपा-शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला. लव्ह जिहाद होऊच नये किंवा अशा प्रकाराला विरोध केलाच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका समाजामध्ये राहिलेली आहे. परंतु एका विशिष्ट पक्षाच्या आणि विशिष्ट गटाच्या माध्यमातून हा मोर्चा काढला जात आहे आणि जसजशा निवडणुका जवळ येतात तसे त्या स्वरूपाचे जनआक्रोश मोर्चे किंवा धर्माच्या संदर्भातल्या कार्यक्रमांना वेग येतो आणि स्वाभाविकतः त्याच्या माध्यमातून एक हिंदुत्व जागृत झाले तर त्याचा मतदानात लाभ होऊ शकतो, अशा स्वरूपाचा राजकीय पक्षांचा हेतू असतो, असेही खडसे यांनी सांगितले.

Back to top button