walking on two legs : माणूस दोन पायांवर का चालतो? | पुढारी

walking on two legs : माणूस दोन पायांवर का चालतो?

लंडन : पाठीचा कणा ताठ ठेवून दोन पायांवर चालणे हे माणसाचे लक्षण त्याला अन्य सस्तन प्राण्यांपासून वेगळे करण्यासाठीचे सर्वात स्पष्ट लक्षण आहे. (walking on two legs) दीर्घकाळापासून मनुष्य प्रजातीचा हा विशिष्ट गुण राहिलेला आहे. दोन पायांवर चालण्याचा आपला हा इतिहास सुमारे 45 लाख वर्षांपासूनचा आहे. मात्र, माणूस दोन पायांवर का चालतो याबाबत अनेक मते प्रचलित आहेत.

बहुतांश मतांनुसार दोन पायांवर चालणे (walking on two legs) हे चार पायांवर चालण्यापेक्षा अधिक कुशलतेचे काम आहे आणि ऊर्जेचा वापर त्याच्याशी संबंधित आहे. दोन पायांवर चालण्याच्या सवयीने माणसाला त्याचे दोन्ही हात अन्य कामे करण्यासाठी मोकळे ठेवत होती. त्यामुळे वेगवेगळी उपकरणे बनवणे किंवा त्यांचा हातान वापर करणे हे माणसाला शक्य झाले.

शिवाय दोन पायांवर उभे राहिल्याने (walking on two legs) झाडांची फळे तोडण्यासारख्याही गोष्टीही माणसाला सोप्या झाल्या. ज्यावेळी माणसाच्या पूर्वजांनी दोन पायांवर चालणे सुरू केले होते, त्यावेळी आफ्रिकेतील सवानाच्या गवताळ मैदाने कमी झाली होती. 40 ते 80 लाख वर्षांपूर्वी वनक्षेत्रात घट झाली होती. त्यामुळे दोन पायांनी जमिनीवर चालणे सोपेही झाले होते. मात्र, काही पुरावे असेही आहेत जे या मताचेही खंडन करतात. होमिनिन शरीर रचना आणि काही वानर प्रजातींचे व्यवहार या सिद्धांताला आव्हान देणारे आहेत.

सुरुवातीच्या काळात होमिनिन प्राण्यांकडे झाडांवरील जीवन जगण्यासाठी अनुकूल स्थिती अधिक होती. लांब शरीर, घुमावदार खांदे आणि मनगट तसेच गोलाकार बोटांचा समावेश यामध्ये होता.(walking on two legs) होमिनिन गवताच्या मैदानात राहत नव्हते. याबाबत बुशबक्स, कोलोबस वानरांचे अध्ययनही उपयुक्त आहे. एकमेव गैरआफ्रिकी एप असलेल्या ओरांगऊटानचाही यासाठी अभ्यास करण्यात आलेला आहे.

आग्नेय आशियातील या एप वानरांच्या अभ्यासातून दिसते की द्विपादवाद झाडांवर राहण्यासाठीचे एक अनुकूल घटकही होता. यामुळे या वानरांना आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये लवचिक फांद्यांवर राहण्यास मदत मिळाली. (walking on two legs)टांझानियातील इस्सा खोर्‍यात असलेल्या सवाना मोजेकमधील चिम्पांझींचाही अभ्यास करण्यात आला. इस्सा चिम्पांझी वूडलँडचे वर्चस्व असलेल्या वताावरणात राहतात. हे चिम्पांझी वुडलँडस्मध्ये जमिनीवरच अधिक वेळ घालवतात असे दिसून आले. अशीच सवय मानवाच्या पूर्वजांमध्येही निर्माण झालेली असावी.

Back to top button