Criminal brain : ‘या’ गुन्हेगाराच्या मेंदूवर 176 वर्षांपासून विशेष संशोधन | पुढारी

Criminal brain : 'या' गुन्हेगाराच्या मेंदूवर 176 वर्षांपासून विशेष संशोधन

लिस्बन : ‘आम्हाला याचा मेंदू हवा आहे, कारण तो जगातील सर्वात हुशार मेंदू आहे…’ असे शास्त्रज्ञ एका गुन्हेगाराविषयी (Criminal brain) म्हणाले होते. हा गुन्हेगार जगातील सर्वात सर्वात खतरनाक सीरियल किलर होता. तथापि, ज्या थंडपणे त्याने 77 शेतकर्‍यांचा खून केला त्यामुळे शास्त्रज्ञांचा मेंदूदेखील पार गोठून गेला. त्यामुळेच या सीरियल किलरचा मेंदू वैज्ञानिकांनी संशोधनासाठी आपल्या ताब्यात घेतला. सध्या ते या मेंदूवर वेगवेगळे प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे या किलरचे डोके गेल्या 176 वर्षांपासून काचेच्या एका भांड्यात जतन करण्यात आले आहे. या किलरचे नाव दिएगो अल्व्हेस. तो स्पेनचा रहिवासी होता; मात्र शेजारच्या पोर्तुगालमध्ये त्याने असा कहर केला की, आज अनेक वर्षांनंतरही त्याचे नाव ऐकून पोर्तुगालच्या नागरिकांचे प्राण कंठाशी येतात. नोकरीच्या शोधात तो पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बनला पोहोचला. पण, त्याला नकाराशिवाय काहीच मिळाले नाही.

आर्थिक तंगी व बेरोजगारीमुळे अल्व्हेसने गुन्हेगारीचा (Criminal brain) असा मार्ग निवडला की, नंतरच्या काळात तो अक्षरशः सैतान बनला. अल्व्हेसला पैशांची गरज होती. त्याने त्यासाठी लूटमार सुरू केली. तो लोकांना पकडून त्यांच्या खिशातील पैसे काढत होता. हळूहळू त्याला हे काम आवडू लागले. आता त्याने या कामासाठी अधिक धोकादायक मार्ग निवडला आणि एका पुलाला त्याने आपला अड्डा बनवला.

या पुलावरून तो साध्या भोळ्या शेतकर्‍यांना ढकलून देऊन त्यांची हत्या करायचा. 1941 साली तो पोलिसांच्या हाती लागला तेव्हा त्याला फासावर लटकावण्यात आले. फाशीनंतर संशोधकांच्या मागणीनुसार (Criminal brain) अल्व्हेसचे डोके सांभाळून ठेवण्यात आले आहे. अल्व्हेसच्या मेंदूचा अभ्यास केला तर त्यातून अनेक नव्या गोष्टी उजेडात येऊन त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे संशोधकांना वाटते.

हेही वाचा : 

Back to top button