India Inequality Report 2022 : देशात इंटरनेट वापरात महिला पिछाडीवरच, शहरी-ग्रामीण दरीही कायम | पुढारी

India Inequality Report 2022 : देशात इंटरनेट वापरात महिला पिछाडीवरच, शहरी-ग्रामीण दरीही कायम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजही देशातील महिला इंटरनेट वापरात पुरुषांच्‍या तुलनेत पिछाडीवरच आहेत. भारतातील १५ टक्‍के महिलांकडे मोबाईल फोनच नाही तर ३३ टक्‍के महिला या इंटरनेटचा वापर करत नाहीत, माहिती  India Inequality Report 2022  मध्‍ये देण्‍यात आली आहे.

ग्रामीण भागातील ३१ टक्‍के लोकसंख्‍याकडून इंटरनेटचा वापर

स्‍वयंसेवी संस्‍था ( एनजीओ ) ऑक्‍सफॅम इंडियाने देशात महिलांच्‍या इंटरनेट वापराबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२१मधील सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकोनॉमीने (सीएमआईई) केलेल्‍या सर्वेक्षणातील प्राथमिक आकड्यांचा आधार घेतला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल रविवार ( दि. ४ ) प्रकाशित करण्‍यात आला. यामध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे की, भारतातील केवळ एक तृतीयांश महिलाच इंटरनेट वापर करतात. केवळ ३१ टक्‍के ग्रामीण लोकसंख्‍या इंटरनेटचा वापर करते तर शहरी भागात ही टक्‍केवारी तब्‍बल ६७ इतकी आहे.

 India Inequality Report 2022 : बिहार, छत्तीसगड, झारखंड पिछाडीवर

अहवालात म्‍हटलं आहे की, देशभरात सर्वाधिक इंटरनेट वापरात महाराष्‍ट्र आघाडीवर आहे. यानंतर गोवा आणि केरळ राज्‍यांचा समावेश आहे. तर देशभरात सर्वात कमी इंटरनेट वापर हा बिहारमध्‍ये होते. त्‍यानंतर छत्तीसगड आणि झारखंड राज्‍यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

 

Back to top button