अतिमहत्त्वाकांक्षेमुळे हरवते मानसिक शांती! | पुढारी

अतिमहत्त्वाकांक्षेमुळे हरवते मानसिक शांती!

वॉशिंग्टन : आपली प्रगती व्हावी असे प्रत्येकालाच वाटणे साहजिक आहे. काही लोक महत्त्वाकांक्षी असतात व सतत आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी झटत असतात. मात्र, अतिमहत्त्वाकांक्षी असणे हे हानिकारक ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. असे लोक व्यावसायिक यशासाठी आपली मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्यही बिघडवून टाकतात.

जर आपण आठ तासांच्या नोकरीत महत्त्वाकांक्षेपायी 12-15 तास घालवू लागला, तुमच्याकडे कुटुंबीयांसाठी तसेच नातेवाईकांसाठी वेळ नसेल, तुमचे स्वतःचे छंद पूर्ण करण्यासाठीही वेळ मिळत नसेल तर आपण अतिमहत्त्वाकांक्षेची शिकार बनला आहात हे समजून घ्या, असे संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकेत मानसिक आरोग्याबाबत ‘यूएस सर्जन’ जर्नलमध्ये याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की बहुतांश अमेरिकन लोकांना वाटते की व्यावसायिक यशासाठी जी धावपळ होत आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होत आहे. कोरोना महामारीनंतर लोकांचा कामाबाबतचा द़ृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे एखादे मोठे लक्ष्य ठेवून त्याच्या पाठीमागे धावत जाण्याऐवजी व त्यासाठी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करण्याऐवजी जीवनात छोटे-छोटे लक्ष्य ठेवणे हितावह ठरते. ही उद्दिष्ट्ये गाठण्याचे सुखही आपण उपभोगू शकतो.

Back to top button