ऑफिसमध्ये थकवा? ‘एनर्जी’साठी ‘हे’ खा! | पुढारी

ऑफिसमध्ये थकवा? ‘एनर्जी’साठी ‘हे’ खा!

निरोगी राहण्यासाठी ऊर्जा देणारे अन्नपदार्थ खाणे, व्यायाम करणे गरजेचं आहे. मात्र पौष्टिक नाश्ता करूनही ऑफिसमध्ये अचानक ‘लो’ वाटायला लागतं. थकवा आणि सुस्ती जाणवते, कामात मन लागतं नाही. मग अशावेळी अनेक जण केवळ साधा चहा घेतात. मात्र डब्यातून काही पोषक पदार्थ आणून ते अशा वेळी खाणे आपल्याला नवी ऊर्जा देणारे ठरू शकतात. अशाच काही पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली माहिती…

हर्बल चहा किंवा कॉफी : थकवा किंवा सुस्ती वाटत असताना साधा चहा घेण्याऐवजी ‘इन्स्टंट एनर्जी’साठी हर्बल चहा किंवा कॉफी घेणे लाभदायक ठरते. कॉफीमध्ये कॅफिन असतं, जे ताजेतवाने होण्यासाठी मदत करते.

अंडे : अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातच उकडलेली अंडी खाल्ल्यास तुम्हाला झटपट एनर्जी मिळते. त्यामुळे शरीरातील ‘एनर्जी लेव्हल’ वाढवण्यासाठी तुम्ही रोज अंडी खाऊ शकता.

पनीर : जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही पनीर, चीज, मोड आलेली कडधान्ये आणि बीन्स हे पदार्थ डब्यात ठेवा. हे प्रथिनयुक्त पदार्थ आहेत, ज्यात मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते.

बदाम : बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे तुमच्या पोटलीत कायम काही बदाम ठेवा, ज्यामुळे तुम्ही बदाम खाल्ल्यास तुम्हाला लगेचच ऊर्जा मिळेल.

केळी : अनेकांना माहिती आहे, केळीमध्ये व्हिटॅमिन बी, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एक केळी खाल्ल्यास तुम्हाला भरपूर आणि झटपट ऊर्जा मिळले.

लिंबूपाणी : जर तुम्हाला अचानक थकवा किंवा चक्कर येत असेल तर तुम्ही एक ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता.

पाणी : निरोगी राहण्याचा उत्तम स्रोत म्हणजे पाणी. त्यामुळे डॉक्टरही सांगतात, भरपूर प्रमाणात पाणी प्या. कमी पाणी प्यायल्यास तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

हंगामी फळं : हंगामी फळांचे सेवन करूनही तुम्ही झटपट ऊर्जा घेऊ शकता.

Back to top button