55 लाख खर्च केले सुंदर दिसण्यासाठी | पुढारी

55 लाख खर्च केले सुंदर दिसण्यासाठी

नवी दिल्ली : सर्वांनाच आपण सुंदर दिसावे, असे वाटत असते. यासाठी बहुतेक पुरुष व महिला अनेक उपाय अंमलात आणतात. एका तरुणीने तर सुंदर दिसण्यासाठी तब्बल 55 लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च केले. उल्लेखनीय म्हणजे या तरुणीने अत्यंत कमी वयात प्लास्टिक सर्जरी करण्यास सुरुवात केली. यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलही केले गेले.

या तरुणीने नुकताच एक आपला व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर शेअर केला. यामध्ये तिने सांगितले की, आपला हा अत्यंत सुंदर चेहरा म्हणजे प्लास्टिक सर्जरीचा परिणाम आहे. टिकटॉकवर या तरुणीला जिराझिओ नावाने ओळखले जाते. तिचा हा व्हिडीओ 26 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे.

जिराझिओ ही जपानची रहिवासी आहे. ज्यावेळी ती अवघी पाच वर्षांची होती, त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी तिच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली होती. खरे तर ही शस्त्रक्रिया जिराझिओच्या आग्रहाखातर करण्यात आली होती. शाळेत तिच्या दिसण्यावरून तिला अन्य सहकार्‍यांकडून चिडविले जायचे. म्हणूनच तिने कॉस्मेटिक सर्जरी करवून घेण्याचा निर्धार केला. उल्लेखनीय म्हणजे जिराझिओच्या इच्छेला तिच्या आई-वडिलांचेही पाठबळ मिळाले.

जिराझिओने त्यानंतर आपल्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक शस्त्रक्रिया करवून घेतल्या. यासाठी तिने तब्बल 55 लाखांहून अधिक पैसे आपल्या आपल्या शस्त्रक्रियेवर खर्च केले. ती सांगते की, नैसर्गिक चेहर्‍यात माणूस चांगला वाटतो, प्लास्टिक सर्जरी करवून घेणे ही काही वाईट बाब नाही. सुंदर दिसण्यासाठी दुसर्‍यांशी तुलना करणे योग्य नाही.

Back to top button