Lunar Eclipse 2022 : उद्या रंगणार चंद्र-पृथ्वीतील सावल्यांचा खेळ, पुढील तीन वर्षांतील शेवटचे 'खग्रास' चंद्रग्रहण! | पुढारी

Lunar Eclipse 2022 : उद्या रंगणार चंद्र-पृथ्वीतील सावल्यांचा खेळ, पुढील तीन वर्षांतील शेवटचे 'खग्रास' चंद्रग्रहण!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Lunar Eclipse 2022 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण उद्या मंगळवारी (दि.8) पाहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. सोबतच हे फक्त या वर्षातीलच नव्हे तर पुढील तीन वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण आहे. कारण मंगळवारनंतर पुन्हा असे खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मून थेट 14 मार्च 2025 मध्ये पाहता येणार आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात दिसणार का?

Lunar Eclipse 2022 : हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असले तरी ते संपूर्ण भारतात पूर्णपणे दिसणार नाही. भारतातील पूर्वेकडील भागात हे चंद्रग्रहण दिसणार असून तेथील काही शहरात संपूर्ण ब्लडमून देखिल दिसेल. मात्र, अन्य भागात चंद्रग्रहण आंशिक स्वरुपातच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक शहरातील खगोलप्रेमींचा भ्रमनिरास होणार आहे.

याशिवाय तुम्ही शहराबाहेरील उंच टेकडीवरून देखिल हे ग्रहण पाहू शकता. टेलिस्कोप किंवा दुर्बीणीतून खगोलप्रेमींना या ग्रहणाचे निरीक्षण करता येईल.

Lunar Eclipse 2022 : काय आहे ‘ब्लड मून’

खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पूथ्वीच्या सर्वात गडद छायेतून जातो त्यामुळे संपूर्ण चंद्रबिंब लाल पडते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होत असते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रबिंब पूर्ण असते. खग्रास चंद्रग्रहण होत असल्याने पूर्ण चंद्र लाल होत असतो. त्यामुळे युरोप अमेरिकेत या चंद्रग्रहणा ब्लड मून ही म्हणतात.

Lunar Eclipse 2022 : महाराष्ट्रात चंद्रग्रहण दिसणार का?

महाराष्ट्रात चंद्रग्रहण मुंबईसह अनेक ठिकाणी आंशिक स्वरुपात दिसणार आहे. महाराष्ट्राला पश्चिम किनारपट्टी आहे. तसेच सह्याद्रीचे कडे हे पश्चिमेला आहे. तर यंदाचे चंद्रग्रहण भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात संपूर्ण दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबईसह अनेक शहरात चंद्रग्रहण हे आंशिक स्वरुपात दिसेल. सायंकाळी 6.04 मिनिटांनी ग्रहण दिसायला सुरुवात होईल ते सायंकाळी 7.26 मिनिटांनी असे एक तास 25 मिनिटे आंशिक चंद्रग्रहण पाहता येईल.

तर नागपूरसह विदर्भात सायंकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी चंद्रग्रहण दिसायला सुरू होईल ते सायंकाळी 7.26 मिनिटांनी त्याची समाप्ती होईल. या भागात चंद्र 60 टक्के अस्पष्ट असेल.

हे ही वाचा :

पीएफवर पालकांना आजन्म पेन्शन

कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेला धार्मिक महत्त्व; आज-उद्या दीपोत्सवाचे आयोजन

Back to top button