भारतातही आहे हृदयाच्या आकाराचे सरोवर | पुढारी

भारतातही आहे हृदयाच्या आकाराचे सरोवर

तिरुवनंतपूरम : हृदयाच्या आकाराची बेटं तसेच तलावही लोकांना आकर्षित करीत असतात. आपल्या देशातही असेच ‘दिलशेप’ सरोवर आहे. केरळमधील वायनाड टेकड्यांपैकी सर्वात उंच शिखर असलेल्या चेम्ब्रा माला येथे हे सरोवर आहे.

निलगिरी पर्वत आणि वेल्लारीमाला या पश्चिम घाटातील पर्वतरांगेतच या उंच टेकड्या आहेत. मेप्पाडी नावाच्या शहरापासून हे ठिकाण जवळ आहे. याच चेम्ब्रा पीकवर हे हृदयाच्या आकाराचे सुंदर सरोवर आहे. अर्थातच ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. आजुबाजूची हिरवाई आणि त्यामध्ये बदामाच्या आकाराचे हे निळेशार सरोवर निसर्ग सौंदर्याचा अनोखा आविष्कार घडवते. अनेक लोक इथे ट्रेकिंगसाठीही येत असतात. हे सरोवर समुद्रसपाटीपासून 2100 मीटर उंच असलेल्या शिखरावर आहे.

Back to top button