कधीही तुटू शकतो डूम्सडे ग्लेशियर | पुढारी

कधीही तुटू शकतो डूम्सडे ग्लेशियर

वॉशिंग्टन : उत्तर ध्रुवीय भागात असलेल्या आर्क्टिकमधील ‘ डूम्सडे ग्लेशियर’ लवकरच तुटण्याची शक्यता आहे. ‘ नेचर जिओसायन्स’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनातील माहितीनुसार फ्लोरिडाच्या आकाराचा हा थ्वाईटस ग्लेशियर जर तुटला तर समुद्राची पातळी वाढवू शकतो. असे जर झाले तर ती एक निश्चितच चिंतेची बाब असेल.

यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातील माहितीनुसार हा ग्लेशियर पुढील दशकभरात तुटू शकतो आणि त्यामुळे जगभरात किनारपट्टीवर वसलेल्या लोकसंख्येला प्रभवित करू शकते. थ्वाईटस ग्लेशियर हा उष्ण समुद्र आणि पश्चिम अंटार्क्टिकाची बर्फाच्या चादर यादरम्यान बफरसारखे काम करतो. म्हणूनच त्याला डूम्सडे ग्लेशियर असे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनात हा ग्लेशियर गेल्या काही शतकांमध्ये वेगाने वितळत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तो आता अधिक वेगानेही वितळू शकतो. मात्र, तो पूर्णपणे वितळल्यानंतरचा परिणाम फारच भीतीदाययक असेल. कारण हा ग्लेशियर नष्ट झाल्यानंतर समुद्राची पातळी 3 ते 10 फुटांनी वाढू शकते.

या ग्लेशियरच्या खालील सागरी तळाचा नकाशा तयार करण्यासाठी संशोधकांनी पाण्याच्या खाली ड्रोनचा वापर केला. यातून असे निष्पन्न झाले की, गेल्या दोन शतकांच्या तुलनेत गेल्या काही वर्षांत हा ग्लेशियर अधिक वेगाने वितळू लागला आहे.

Back to top button