थ्वाईटस् ग्लेशियरच्या वितळण्याचा वाढला वेग | पुढारी

थ्वाईटस् ग्लेशियरच्या वितळण्याचा वाढला वेग

न्यूयॉर्क : अंटार्क्टिकामधील एक ग्लेशियर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वितळत असल्याचे शास्त्रज्ञांनी याच महिन्यात स्पष्ट केले आहे. ‘नेचर जियोसायन्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील माहितीनुसार गेल्या सहा वर्षांत अचानक बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले. यामुळे ‘थ्वाईटस् ग्लेशियर’ वर्षाला 1.3 मैल (2.1 कि.मी.) इतका मागे सरकत आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या दशकापेक्षा चालू दशकात बर्फ वितळण्याचा वेग जवळजवळ दुप्पट बनला आहे. अशा ग्लेशियर वितळण्याच्या घटनांमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होणार आहे. यामुळेच थ्वाईटस् ग्लेशियरला ‘कयामत के दिन का ग्लेशियर’ अथवा ‘डूम्सडे ग्लेशियर’ म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, पीपल पत्रिकेतील माहितीनुसार थ्वाईटस् ग्लेशियर हे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याच्या आकाराइतके आहे. समुद्राची पातळी वाढण्यात अंटार्क्टिकाचा सहभाग पाच टक्के इतका होऊ शकतो. सागरी विशेषज्ञ व या संशोधनाचे सहलेखक रॉबर्ट लार्टर यांनी सांगितले की, भविष्यात आम्हाला कमी वेळेत मोठे बदल पहावयास मिळतील.

यात वर्षागणिक ग्लेशियरच्या क्षेत्रात घट झालेली दिसेल. या संशोधनाने ग्लेशियरचे वितळणे आणि त्याच्या संभाव्य परिणामांची कल्पनाच करवून दिली आहे. ‘इंटरनॅशनल थ्वाईटस् ग्लेशियर कोलॅबरेशन’ने 2020 मध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर हा ग्लेशियर पूर्णपणे समुद्रात कोसळला तर समुद्राची पातळी चार टक्क्यांनी म्हणजेच 25 इंचाने वाढेल. असे जर झाले तर द. लुसियाना आणि मिसिसिप्पी उद्ध्वस्त होती, तसेच मोठा परिणाम न्यूयॉर्क शहरावरही दिसून येण्याची शक्यता आहे.

Back to top button