पृथ्वीला किती चंद्र असणे शक्य होईल? | पुढारी

पृथ्वीला किती चंद्र असणे शक्य होईल?

लंडन : आपल्या ग्रहमालिकेतील गुरू या ग्रहाला तब्बल 80 चंद्र आहेत तर शनीला 83 चंद्र आहेत. आपल्या पृथ्वीला एकच नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र आहे. मात्र पृथ्वीला जास्तीत जास्त किती चंद्र असणे शक्य होईल याबाबतचा एक अभ्यास करण्यात आला. त्याप्रमाणे पृथ्वी आणखी दोन चंद्र हाताळू शकते.

पृथ्वी अशा स्थितीत आहे की ती एकापेक्षा अधिक चंद्रही सामावून घेऊ शकते. तीन हजार वर्षांच्या सिम्युलेशनवर यासाठी एक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असे दिसून आले की पृथ्वी सध्याच्या चंद्राप्रमाणे आणखी दोन चंद्र सामावू शकते. चंद्राचा आकार लहान असेल तर अधिक चंद्र आकाशात राहू शकतात. संशोधकांनी त्यांच्या सिम्युलेशनच्या आधारे म्हटले आहे की पृथ्वीच्या वास्तविक चंद्राप्रमाणेच आकाशात आणखी दोन चंद्र सामावू शकतात. एका अभ्यासात आढळून आले की आणखी तीन चंद्रही आकाशात असू शकतात, पण त्यांचा आकार वेगळा असेल. पहिला जो वास्तविक चंद्राच्या बरोबरीचा आहे, दुसरा जो या चंद्राच्या सहाव्या भागाच्या बरोबरीचा आहे आणि तिसरा जो चंद्राच्या शंभराव्या भागाइतका आहे.

टेक्सास विद्यापीठाचे संशोधक सुमन सत्याल यांनी सांगितले की शनी व गुरूचे सर्व चंद्र वेगवेगळ्या आकाराचे आहेत. कोणत्याही सिम्युलेशनची गणना केली जाऊ शकते. मात्र त्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती चांगली व वाईट अशी दोन्ही प्रकारची असू शकते. भौतिकशास्त्रज्ञ बिली क्वार्ल्स यांनी सांगितले की त्यांच्या गणनेत गुरुत्वाकर्षणाचा समावेश केलेला नाही. रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मंथली नोटीसमध्ये म्हटले आहे की चंद्राच्या आगमनाने पृथ्वीवरील रात्रीचे सौंदर्य वाढेल, पण पृथ्वीपासून चंद्राचे अंतर वेगळे असेल.

Back to top button