एकच मास्क वापरा तब्बल पाच वर्षांपर्यंत… | पुढारी

एकच मास्क वापरा तब्बल पाच वर्षांपर्यंत...

रोहतक : भारतीय शास्त्रज्ञांनी 3-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा वापरता येण्याजोगा आणि धुण्यायोग्य एन-95 मास्क तयार केला आहे. हा मास्क गंधहीन, अ‍ॅलर्जीविरहित आहे. त्याचे चार स्तर असून त्याचा बाह्य स्तर सिलिकॉनचा बनलेला आहे. ज्यामुळे तो वापरानुसार पाच वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल. या मास्कचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नॅनो-पार्टिकल कोटिंग वापरण्यात आले आहे. ते अत्यंत संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रसार रोखतेच, शिवाय उच्च प्रदूषण असलेल्या ठिकाणीही ते उपयुक्‍त ठरते.

याचा वापर करून अत्यंत प्रदूषित ठिकाणी काम करणारे कामगार फुफ्फुसाच्या समस्या आणि अस्थमासारख्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतात. कोव्हिड-19 सारख्या संसर्गापासून बचाव करण्याव्यतिरिक्‍त, ते सिमेंट कारखाने, वीटभट्ट्या, कापूस कारखाने आणि रंग उद्योगातील कामगार देखील वापरू शकतात. भारतीय शास्त्रज्ञांनीही त्याच्या पेटंट आणि ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. भारतात विकसित केलेल्या या मास्कला नॅनो ब्रेथ म्हणतात. एमिटी युनिव्हर्सिटी हरियाणामधील चार भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अतुल ठाकूर, डॉ. प्रीती ठाकूर, डॉ. लकी कृष्णा आणि प्रो. पीबी शर्मा आणि एक संशोधन अभ्यासक दिनेश कुमार आणि अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठातील प्रो. राकेश श्रीवास्तव यांनी संयुक्‍तपणे यामध्ये योगदान देऊन एन.-95 मास्क विकसित केले आहेत.

Back to top button