भारतात बनली अत्यंत पातळ प्रोटिन फिल्म | पुढारी

भारतात बनली अत्यंत पातळ प्रोटिन फिल्म

नवी दिल्ली : भारतीय संशोधकांनी उत्कृष्ट थर्मल, मेकॅनिकल आणि पीएच स्थिरतेबरोबर अल्ट्रा-थीन हेट्रो-प्रोटिन फिल्म (झडप) विकसित करण्यात यश मिळवले आहे. यामुळे बायोमेडिकल आणि खाद्य पॅकेजिंग व्यवसायांमध्ये पातळ फिल्मच्या वापराचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल.

आसामची राजधानी गुवाहाटीतील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाशी संबंधित स्वायत्त संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (आयएएसएसटी)च्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. तेथील संशोधकांनी दोन ग्लोब्युलर प्रोटिन ‘बोवाईन सीरम एल्ब्युमिन (बीएसए) आणि लायसोजाइम (एलआयएस) ने युक्त अत्याधिक पातळ मोनोलेअर प्रोटिन झडप विकसित केली.

यासाठी त्यांनी लँगम्यूर-ब्लॉडगेट (एलबी) तंत्राचा वापर केला. त्यामुळे नॅनोमीटर स्तरावरील पातळ फिल्म मिळवता आली. ही नवी झडप अन्य प्रोटिन किंवा प्लास्टिकच्या झडपांच्या तुलनेत मुलायम व बारीक आहे. ती अन्य झडपांच्या तुलनेत अधिक लवचिकही आहे.

Back to top button