कोरोनामुळे मेंदूला येऊ शकते सूज | पुढारी

कोरोनामुळे मेंदूला येऊ शकते सूज

लंडन :

जगभरात कोरोनाचा वेगाने फैलाव होतच असून ‘कोविड-19’ बाबतही सातत्याने नवे संशोधन होत आहे. आता एका संशोधनात असे आढळले आहे की कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या मेंदूला सूज येत आहे. 

सर्वसाधारणपणे कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर ताप व सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे दिसतात. मात्र, अन्यही वेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येऊ शकतात असे आढळले होते.

काही दिवसांपूर्वीच संशोधकांनी कोरोनामुळे मेंदूच्या समस्याही निर्माण होऊ शकतात असे म्हटले होते. आता असे दिसून आले आहे की कोरोनामुळे मेंदूच्या विशिष्ट भागावर सूज येऊ शकते. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता बाधित होऊ शकते. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी कोरोना विषाणूच्या मेंदूशी निगडीत लक्षणांची तपासणी केली. त्याबाबतचे निष्कर्ष त्यांनी ‘ब—ेन’ नावाच्या नियतकालिकात प्रकाशित केले आहेत. या संशोधनात असे दिसून आले की कोरोनामुळे मेंदूला सूज येणार्‍या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर डेलीरियम म्हणजेच मानसिक क्षमतांमधील गंभीर समस्याही दिसून आल्या. अपेक्षेपेक्षा अधिक लोकांमध्ये मेंदूच्या समस्या व सूज दिसून आल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. डेलीरियम, ब—ेन डॅमेज, नर्व्ह डॅमेज, ब—ेन इन्फ्लेमेशन आणि स्ट्रोकच्या समस्या या रुग्णांमध्ये दिसल्या आहेत.

Back to top button