अंड्यातील डायनासोरच्या जीवाश्माचे थ्रीडी मॉडेल | पुढारी

अंड्यातील डायनासोरच्या जीवाश्माचे थ्रीडी मॉडेल

न्यूयॉर्क ः

अर्जेंटिनामध्ये पॅटागोनिया येथे डायनासोरचे अंडे सापडले होते. त्यामध्ये अंड्यातून बाहेर न पडलेल्या भ—ूणाच्या कवटीचे जीवाश्मही होते. आता संशोधकांनी त्यावरून डायनासोरचे थ—ीडी मॉडेल बनवले आहे. टायटॅनोसॉर नावाच्या डायनासोर कुळाविषयी माहिती मिळवण्यासाठी हे मॉडेल उपयुक्‍त ठरेल.

या जीवाश्माच्या थ—ीडी स्कॅनिंगमधून त्याचे थक्‍क करणारे तपशील समोर आले होते. टायटॅनोसॉर किंवा सॉरोपॉड हे आतापर्यंत पृथ्वीतलावर वावरलेले सर्वात मोठ्या आकाराचे जीव होते. त्यांच्या अंड्यातील पिल्‍लाच्या 1.2 इंच रुंदीच्या कवटीचे जीवाश्म सापडले होते. हे जीवाश्म अत्यंत दुर्मीळ असून ते 8 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. त्याच्यावर नाजूक त्वचा असून कवटी, दात यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

‘सिंक्रोट्रोन मायक्रोटोमोग्राफी’ नावाच्या अद्ययावत इमेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून याबाबतचे संशोधन करण्यात आले. त्यावरून या न जन्मलेल्या पिल्‍लाच्या थ—ीडी इमेजही बनवण्यात आल्या व त्याचे थ—ीडी मॉडेल बनवण्यात आले. स्लोव्हॅक रिपब्लिकमधील पाव्होल जोझेफ सफारीक युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे मॉडेल बनवले आहे.

 

Back to top button