पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी आज (दि.१३) बिहार दौऱ्यावर आहेत. दरम्यान सभेपूर्वी त्यांनी येथील पटना साहिब गुरूद्वाराला (Narendra Modi) भेट दिली. यावेळी लंगरमध्ये त्यांनी सेवा दिली. या प्रसंगीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारमधील पटना साहिब गुरुद्वार येथे भेट दिली आणि प्रार्थना केली. या प्रसंगी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रोटी लाटली. तसेच त्यांनी भाविकांना लंगरमध्ये जेवणही वाढले. यावेळी मोदींनी शीख पगडीदेखील परिधान केली होती. तसेच एका फोटोत पंतप्रधान गुरुद्वाराच्या आवारात एका लहान मुलाशी हस्तांदोलन करतानाही दिसतात.
तत्पूर्वी रविवारी, पंतप्रधानांनी पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्यासह भव्य रोड शो केला. यावेळी खास डिझाइन केलेल्या वाहनावर उभे राहून पंतप्रधान मोदींनी रस्त्यांच्या कडेला जमलेल्या लोकांना अभिवादन केले. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भाजपचे झेंडे दिसत असल्याने संपूर्ण रस्ता भगव्या रंगांनी सजला होता आणि पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि समर्थकही भगव्या शाल आणि टोप्या परिधान करून पीएम मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. बिहारमधील पाटणा येथे काल (दि.१२ मे) झालेल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील (Narendra Modi) हाय-व्होल्टेज रॅलीला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसला.
हेही वाचा: