दीपिका पुन्हा एकदा शाहरूखसोबत? | पुढारी | पुढारी

दीपिका पुन्हा एकदा शाहरूखसोबत? | पुढारी

नवी दिल्ली : बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खानचे असंख्य चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहेत. किंग खानने एक चित्रपट साईन केला असल्याची चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, या आगामी चित्रपटाबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तरीही सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार शाहरूख खान लवकरच एका तमिळ डायरेक्टरच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात दीपिका पदुकोणही दिसण्याची शक्यता बळावली आहे.

जर या आगामी चित्रपटात शाहरूख व दीपिका यांनी सिल्व्हर स्क्रीन शेअर केली तर या लोकप्रिय जोडीचा हा चौथा चित्रपट असेल. यापूर्वी या दोघांनी ओम शांती ओम, चेन्नई एक्स्प्रेस आणि हॅपी न्यू इयर या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. तमिळ डायरेक्टर एटली कुमार यांचा हा आगामी चित्रपट शाहरूख आणि दीपिका साईन करू शकतात, असे समजते. असे झाले तर एटली यांचा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड प्रवेश असेल. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत असे काहीच सांगण्यात आलेले नाही.

दरम्यान, असेही समजते की, शाहरूख आणि दीपिका यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘सनकी’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची कहाणी दीपिकाला फारच आवडली असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी होते, याची प्रतीक्षा करावी लागेल.

Back to top button