रुग्णांमधील अँटिबॉडीज होत नाहीत तातडीने कमी | पुढारी

रुग्णांमधील अँटिबॉडीज होत नाहीत तातडीने कमी

वॉशिंग्टन :

कोरोनाच्या विळख्यात सापडणार्‍या लोकांच्या शरीरातील अँटिबॉडीजवर आता नवे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार कोरोना रुग्णांमध्ये तयार होणार्‍या अँटिबॉडीज तातडीने कमी होत नाहीत. 

यासंबंधी करण्यात आलेल्या आणखी एका संशोधनातील निष्कर्षानुसार ठराविक वेळेनंतर कोरोना रुग्णांमधील अँटिबॉडीजचे प्रमाण कमी होत जाते आणि पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते. याऊलट नव्या संशोधनातील माहितीनुसार सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोना रुग्णाला अँटिबॉडीजच्या माध्यमातून भक्कम सुरक्षा मिळते. जी तब्बल पाच महिन्यांपर्यंत सक्रिय राहू शकते. तसेच इम्यून सिस्टीममुळे दुसर्‍यांदा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता घटते.

अमेरिकेतील ‘माऊंट सिनाई हॉस्पिटल’चे वरिष्ठ संशोधक फ्लोरियन क्रेमर यांनी सांगितले की, काही संशोधनामध्ये अँटिबॉडीजमध्ये वेगाने घट होते, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नव्या संशोधनामधील निष्कर्ष याच्या उलट आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडणार्‍या सुमारे 90 टक्यांहूनही जास्त लोकांमध्ये या विषाणूला प्रभावहीन करणारी अँटिबॉडीजची निर्मिती होते. तसेच ती अनेक महिने सक्रियसुद्धा राहते. सुमारे 30 हजार 82 लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनातून वरील महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Back to top button