चंद्रासारख्या संरचनेचा मंगळाजवळ लघुग्रह | पुढारी | पुढारी

चंद्रासारख्या संरचनेचा मंगळाजवळ लघुग्रह | पुढारी

न्यूयॉर्क : आंतराष्ट्रीय ग्रहशास्त्रज्ञांच्या एका पथकाने मंगळ ग्रहाच्या पाठीमागे एका लघुग्रहाचा शोध लावला आहे. या लघुग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रासायनिक संरचना अगदी चंद्रासारखीच आहे. संशोधकांच्या मते, हा लघुग्रह म्हणजे अवशेषांचा एक प्राचीन तुकडा असू शकतो. 

चंद्र, पृथ्वी आणि मंगळ यांच्यादरम्यान झालेल्या धडकेमुळे या लघुग्रहाची निर्मिती झाली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. इकारस जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ट्रोजन हे एक खास प्रकारचे लघुग्रह असतात आणि ते आपल्या ग्रहाभोवती फिरतात. कधी कधी ते समूहात असतात. असे हजारो ट्रोजन सध्या गुरू या आपल्या सूर्यमालेतील मोठ्या ग्रहाच्या कक्षात फिरत आहेत. असाच एक लघुग्रह मंगळाच्या कक्षेत फिरताना आढळून आला आहे. इटली, बल्गेरिया आणि अमेरिकेच्या खगोल शास्त्रज्ञांचा समावेश असलेले एक पथक सध्या या लघुग्रहाबाबत संशोधन करत आहे.

या लघुग्रहाची आणि चंद्राची संरचना समान असल्याने संशोधक अधिक सविस्तरपणे याबाबत संशोधन करत आहेत. या संशोधनातून आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल काही ठोस माहिती मिळते का, याची ते चाचपणी करत आहेत. दरम्यान, या लघुग्रहाला 1998 व्हीएफ 31 असे नाव दिले आहे. त्याचा रंग व संरचना आताच्या चंद्रासारखीच आहे, असे खगोल शास्त्रज्ञ एपाशेस्टोलोस क्रिस्टोऊ यांनी सांगितले.

 

Back to top button