पुस्तकात सापडले तिकीट; लागली पाच कोटींची लॉटरी! | पुढारी

पुस्तकात सापडले तिकीट; लागली पाच कोटींची लॉटरी!

टोरांटो : कुणाचे नशीब कधी व कसे फळफळेल हे काही सांगता येत नाही. कॅनडातील एका कुटुंबाला त्याचा अनुभव आला. निकोल पेडनॉल्ट आणि रॉजर लारोक हे दाम्पत्य आपल्या नातवाचा अभ्यास घेत असताना त्यांना पुस्तकात एक लॉटरी तिकीट सापडले. हे तिकीट त्यांनीच 2018 मध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त खरेदी केले होते. आता या तिकिटाला तब्बल 5 कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याचे त्यांना आढळून आले आहे!

या तिकिटातून त्यांनी दहा लाख कॅनेडियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 5 कोटी 16 लाख रुपये जिंकले आहेत. विशेष म्हणजे या तिकिटाची वैधता संपण्यासाठी काही दिवसच शिल्‍लक असताना त्यांना हे तिकीट सापडले. शिवाय त्याला इतकी मोठी लॉटरी लागल्याने हे वृद्ध दाम्पत्य खरोखरच भाग्यवान असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांनी तिकीट खरेदी करून ते एका पुस्तकात ठेवून दिले होते. त्यानंतर ते या तिकिटाची गोष्ट विसरूनच गेले. नातवाचा गृहपाठ घेत असताना त्यांना योगायोगाने हे तिकीट सापडले व त्यांनी त्याबाबतचा पाठपुरावा केला. त्यावेळी आपल्याला कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागल्याचे त्यांना समजले!

 

Back to top button