चांगल्या ऑक्सिजन स्तरासाठी ‘हे’ उपयुक्त | पुढारी

चांगल्या ऑक्सिजन स्तरासाठी ‘हे’ उपयुक्त

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच फुफ्फुसांचे आरोग्य व शरीरातील ऑक्सिजनचा स्तर चांगला ठेवण्यासाठीही विशिष्ट आहार उपयुक्त ठरू शकतो. त्यामध्ये काही फळे व खाद्यपदार्थ सहायक ठरतात.

लिंबूमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते आणि त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पिणे लाभदायक ठरते. ऑक्सिजन लेव्हल सामान्य ठेवण्यासाठीही लिंबू उपयुक्त आहे. ‘किवी’ फळामध्ये ‘क’ व ‘ई’ जीवनसत्त्वे असतात. तसेच पोटॅशियम, फॉलेटसह रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे अनेक घटक असतात. यामधील भरपूर प्रमाणात असणारे अँटिऑक्सिडंट ऑक्सिजनचा स्तर सामान्य ठेवण्यासाठी मदत करतो. शरीरातील ऑक्सिजनचा स्तर वाढवण्यासाठी केळीही उपयुक्त ठरतात. या फळात अल्कलाईन मोठ्या प्रमाणात असते जे ऑक्सिजनची कमतरता दूर करते. लसणामध्येही अनेक औषधी गुण असतात. हृदयाच्या आरोग्याबरोबरच ऑक्सिजनच्या चांगल्या स्तरासाठीही लसूण उपयुक्त ठरतो. दह्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि प्रोटिन्स असतात. त्याच्या सेवनाने ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. दही रात्रीच्या वेळी नव्हे तर दिवसाच खाणे हितावह ठरते.

Back to top button