नदीत सापडला सात फुटांचा मासा! | पुढारी

नदीत सापडला सात फुटांचा मासा!

न्यूयॉर्क : अमेरिकेत डेट्रॉईट नदीत तब्बल सात फूट लांबीचा मासा सापडला आहे. 109 किलो वजनाचा हा मासा शंभरपेक्षाही अधिक वयाचा असावा असे म्हटले जात आहे. मिशिगनमध्ये नदीत हा मासा सापडला.

या माशाची अचूक लांबी 6 फूट दहा इंच इतकी आहे. अशा प्रकारचा हा अमेरिकेत सापडलेला आतापर्यंतचा सर्वात  मोठा मासा ठरला आहे. काही संशोधक याठिकाणी वैज्ञानिक पाहणी करीत असताना हा मासा आढळून आला. त्याचे मोजमाप घेऊन व टॅग लावून त्याला पुन्हा पाण्यात सोडून देण्यात आले. हा खरोखरच एक ‘रिव्हर मॉन्स्टर’च होता असे त्यांनी म्हटले आहे. याठिकाणी आतापर्यंत जे मोठे मासे सापडले त्यांच्यापेक्षा दुप्पट लांबीचा हा मासा होता. हा स्टर्जन जातीचा मादी मासा होता. डेट्रॉईट नदीत सुमारे सात हजार स्टर्जन मासे असावेत असा अंदाज आहे. या माशांच्या तोंडात दात नसतात. ते पाणी तोंडात ओढून घेऊन पाण्यातील भक्ष्याची शिकार करतात.

Back to top button