अंतराळात अजूनही दिसत आहेत गूढ वर्तुळे | पुढारी

अंतराळात अजूनही दिसत आहेत गूढ वर्तुळे

वॉशिंग्टनः गेल्या काही वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञांना अंतराळात गूढ वर्तुळ दिसून येत आहेत. या वर्तुळाकार रेडिओ रचनांचे संशोधकांना कुतुहल वाटत आहे. या वर्तुळांविषयीचे गूढ अद्यापही उलगडलेले नाही. आता असेच आणखी एक वर्तुळ दिसून आले आहे.

2019 मध्ये अशा वर्तुळांचा सर्वात आधी छडा लागला. त्यावेळी रात्रीच्या वेळी आकाशाचा नकाशा बनवला जात असताना ‘ऑस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे पाथफायंडर’ (एएसकेएसपी)ने ही वर्तुळे शोधली. पश्चिम ऑस्ट्रेलियातून अंतराळात पाहिल्यावर अशी वर्तुळे दिसून आली होती. रेडिओ लहरींमध्ये चकाकणार्‍या कृष्णविवर किंवा मोठ्या आकाशगंगांचे हे संकेत असावेत असे तेथील संशोधकांना वाटते. न्यू मेक्सिकोमधील अ‍ॅना कॅपिंस्का यांनीही अशी चार चमकदार रेडिओ सर्कल्स शोधून काढली. मात्र, वेगळ्या वेव्हलेंग्थमध्ये टेलिस्कोपमधून ही वर्तुळे पाहायला गेले की ती द़ृष्टीस पडत नाहीत.

Back to top button