५५ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी सापडली ! | पुढारी

५५ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी सापडली !

न्यूयॉर्क ः अनेक वेळा अतिशय अनपेक्षित अशा घटना घडत असतात. एका जोडप्याची वेडिंग रिंग म्हणजेच लग्‍नातील अंगठी 55 वर्षांपूर्वी हरवली होती. ही अंगठी त्यांनी घर विकल्यावर नव्या घरमालकाला सापडली! 55 वर्षांनंतर ही वेडिंग रिंग सापडल्याने वृद्ध दाम्पत्याला अत्यानंद झाला.

रॅन्सम जोन्स नावाच्या गृहस्थाची ही अंगठी होती. त्यांनी सांगितले की पाच दशकांपेक्षाही अधिक काळापूर्वी फ्रीसबोरोमध्ये वडिलोपार्जित घरात एका सुतारकामानंतर ते साफसफाई करीत असताना ही लग्‍नाची अंगठी हरवली होती. अतिशय कमी काळच ही अंगठी त्यांच्या बोटात होती. अनेक वर्षे या अंगठीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांची पत्नी व—ेन नेहमी त्यांना ही अंगठी शोधण्यास सांगत असे. 2006 मध्ये त्यांनी हे घर विकले. त्यानंतर नव्या घरमालकाला अचानक ही हरवलेली अंगठी सापडली आणि त्यांनी ती मूळ मालकाला दिली!

Back to top button