‘ग्रेट बॅरिअर रिफ’वर वाढत आहे धोका | पुढारी

‘ग्रेट बॅरिअर रिफ’वर वाढत आहे धोका

सिडनी : एका नव्या अहवालात म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाभोवतीच्या समुद्रातील वाढलेली उष्णता आणि मोठ्या लाटांमुळे तेथील सर्वात मोठ्या प्रवाळरांगा असलेल्या ‘ग्रेट बॅरिअर रिफ’ला धोका वाढलेला आहे.

ऑस्ट्रेलियातील पर्यावरण समूह ‘क्लायमेट कौन्सिल’ने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. देशाच्या ईशान्य तटाजवळील समुद्रातील तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रेट बॅरिअर रिफमध्ये एक सामूहिक ‘ब्लिचिंग’चा धोका वाढला आहे. ज्यावेळी प्रवाळं आपल्या आतील शैवालांना बाहेर टाकते व त्यांचा रंग सफेद होतो त्यावेळी या घटनेला ‘ब्लिचिंग’ असे म्हटले जाते.

गेल्या सहा वर्षांमध्ये याठिकाणी तीनवेळा सामूहिक ब्लिचिंग झाले असून आणखी एका ब्लिचिंगचा धोका वाढला आहे. संकटात सापडलेल्या या प्रवाळरांगांची पाहणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या एका पथकानेही दौरा सुरू केला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या ग्रेट बॅरिअर रिफ मरीन पार्क प्राधिकरणाने म्हटले होते की क्वीन्सलँड राज्याच्या तटाजवळ बहुतांश मरीन पार्क्समध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमधील उष्णतेचा स्तर बराच वाढला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button